By  
on  

संकर्षण क-हाडे म्हणतो, ‘प्रेक्षकांचं प्रत्यक्ष मनोरंजन करण्याचं सुख फार फार निराळं आहे’

अभिनय, सुत्रसंचालन, कविता यातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता म्हणजे संकर्षण क-हाडे. संकर्षण सध्या ‘तु म्हणशील तसं’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. संकर्षणला लॉकडाऊनमध्ये रंगभूमीची आठवण येते आहे. यासाठी त्याने खास पोस्टही केली आहे.

 

 

आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘ह्या #lockdown च्या काळात नं .. दर दिवशी नाटकाच्या प्रयोगांची खूप, खूपच आठवण येते....️
दुपार १२.३० , ४.३० .. तसंच संध्याकाळी ५.३० , रात्री ८.३० , ९.३० ह्या अशा प्रयोगांच्या वेळा झाल्या नं कि ,
“तिसरी द्या .....” हे वाक्यं कानांमध्ये ऐकु येतं ..!!
कारण, पडदा उघडल्यावर धडघडत्या छातीने Entry घेउन , रोज नव्या जोमाने आणि जबाबदारीने प्रयोग करुन प्रेक्षकांचं प्रत्यक्ष मनोरंजन करण्याचं सुख फार फार निराळं आहे....
तुम्ही सहमत आहात का ह्याच्याशी ..??

हळु हळु सगळं सुरळीत होतांना दिसतं आहे....
लवकरच नाटकाचे प्रयोग पण तुमच्या तुडुंब प्रतिसादात सुरु होतील अशी आशा करतो..
तोपर्यंत , काळजी घ्या .... लवक्कर भेटू......

Author

Recommended

PeepingMoon Exclusive