By  
on  

'तुझं लग्न झालंय का?', या चाहत्याच्या प्रश्नावर भाग्यश्री मोटेने दिलं आश्चर्यचकित करणारं उत्तर

चाहत्यांना आजकाल त्यांच्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची सहज संधी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मिळते. आस्क मी एनिथिंग या सेशनचा अनेक सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी अनेकदा वापर करताना दिसतात. त्यामुळे कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल  नवी माहिती मिळते. 

अभिनेत्री भाग्यश्री मोटे  सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नेहमीच आपले हटके फोटोशूट शेअर  करुन चाहत्यांना आश्चर्यचकित करते. पण आता मात्र भाग्यश्रीने तिच्या उत्तराने चाहत्यांना आश्चर्यचकित करते

भाग्यश्री प्रत्यक्ष आय़ुष्यात खुपच बोल्ड आणि बिनधास्त आहे. तिच्या अनेक पोस्टवरुन ते नेहमीच लक्षात येतं. अलिकडेच भाग्यश्रीने आस्क मी एनिथिंग है लाईव्ह सेशन केलं त्यात तिने एकापेक्षा एक जबरदस्त उत्तरं देत चाहत्यांची मनं जिंकली. 

एका चाहत्याने विचारलं की तुला मराठीत काम करायला आवडेल की हिंदीतला 5 मिनिटांचा रोल आवडेल. तर तिने यावर उत्तर दिलं, मुझे कुए से प्यार है. म्हणजेच मला माझी माय मराठी प्रेम आहे. 

तर एका चाहत्याने तिला विचारलं तुझं लग्न झालं आहे का किंवा झालं नसेल तर तुला कसा पार्टनर हवाय, यावर भाग्यश्रीने भन्नाट उत्तर दिलं. ती म्हणाली मी माझ्या कामासोबत लग्न केलंय आणि मी खुप खुश आहे. 

 'पाटील' आणि 'माझ्या बायकोचा प्रियक'र , काय रे रास्कला या मराठी सिनेमानंतर भाग्यश्री दाक्षिणात्य सिनेमांतसुध्दा झळकली. इतकचं नाही तर ती हिंदीतही चमकतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive