By  
on  

या मराठी अभिनेत्रीचं स्वप्न सत्यात उतरलं, शेअर केला खास फोटो

स्व-कमाईची कुठलीही पहिली गोष्ट ही प्रत्येकासाठी खुप खास असते. मग ते घर असो किंवा गाडी. असाच एक जबरदस्त कारनामा या मराठी अभिनेत्रीने केला आहे. ही अभिनेत्री म्हणजेच वनिता खरात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेमुळे वनिता खरात हे नाव घराघरांत पोहचलंय. अफलातून स्किट्स मधील धमाकेदार कॅरेक्टर्समधून वनिता प्रेक्षकांच्या भेटीला येते. आपल्या विनोदांच्या अचूक टाईमिंगमधून आणि अभिनयातून ती प्रेक्षकांना  खळखळून हसवते. नुकतीच वनिताची  इच्छापूर्ती झाली आहे. याबाबतची एक खास पोस्ट तिने चाहत्यांशी शेअर केली. 

अभिनेत्री वनिता खरातचं पहिली-वहिली कार घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. इच्छापूर्ती असं कॅप्शन देत वनिताने आपली नव्या को-या गाडीचा फोटो पोसेट केला आहे. वनिताच्या या कारनाम्याबद्दल चाहत्यांसह सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

 

 

कबीर सिंह या सिनेमात अभिनेता शाहीद कपूरची मोलकरीण आठवतेय....छोटाच सीन होता पळण्याचा. शाहिद तिा मारण्यासाठी मागे मागे धावतो. तिच ही अभिनेत्री वनिता खरात. वनिताने नाटकांमधूूनसुध्दा आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. 

विशेष म्हणजे अलिकडेच वनिताने एका कॅलेंडरसाठी बोल्ड फोटोशूट करत नवा पायंडा पाडला. वनिता खरातने शेअर केलेला हा बोल्ड फोटो फक्त शाब्दिकरित्या बोल्ड नसून तो वैचारिकदृष्ट्या ही बोल्ड आहे. आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळतगता वनिता खरातने हे फोटोशूट केलं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive