By  
on  

Photos : संजना फेम रुपाली भोसलेचा हा नऊवारीतला नखरा पाहिलात का?

'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा म्हणजे संजना. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री रुपाली भोसले साकारतेय. तिच्या दमदार अभिनयाने ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरतेय. रुपाली ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. अनेक नवनवे फोटोशूट ती नेहमीच चाहत्यांशी शेअर करते. आता तर रुपालीने चक्क नऊवारी साडीतले तिचे मनमोहक फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

लाल रंगाच्या साडीलं रुपालीचं हे दिलखेचक फोटोशूट पाहून चाहते प्रेमात पडले आहेत.

कपाळी चंद्रकोर आणि नाकात पारंपारिक नथ असा मराठमोळा साज केलेल्या रुपालीच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

पेशवाई नऊवारी साडी असल्याने तिचा हा लुक बाजीराव मस्तानी सिनेमातील नायिकांप्रमाणेच दिसतोय. 

 

 

रुपाली खुपच सुरेख दिसते आहे. तिचं हे फोटोशूट चाहत्यांना घायाळ करतंय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive