By  
on  

‘बिटरस्वीट’ सिनेमाची कान्स महोत्सवासाठी निवड, या विषयावर आहे आधारित

उसतोड महिला कामगार यांच्या जीवनावर आधारित असलेल्या बिटरस्वीट या सिनेमाची कान्स सिनेमहोत्सवात निवड झाली आहे. साखर उद्योगाची आतलं वास्तव या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. साखर उद्योगातील कामगार स्त्रीचं कशाप्रकारे शोषण केलं जातं.या स्त्रियांची गर्भाशयं काढली गेली आहेत. कारण काम करण्यासाठी येणारे शारिरीक अडथळे यातून दूर होतात.

 

 

हे काम करत असलेल्या लोकांविरुद्ध त्यांच्या पद-प्रतिष्ठेविरोधात कुणीही बोलत नाही. पण सगुणा नावाची एक स्त्री याविरोधात उभी राहते. त्या संघर्षाची गोष्ट या सिनेमात आहे. सुचंदा आणि शुभा शेट्टी यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. हा जवळपास 101 मिनिटांचा सिनेमा आहे. या सिनेमाचं शुटिंग बीडमध्ये झालं आहे. क्वेस्ट फिल्मसने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात अक्षया गुरव, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, गुरु ठाकूर, असित रेडीज, विनायक दिवेकर, स्मिता तांबे मुख्य भूमिकेत दिसत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive