By  
on  

गश्मीर महाजनीचा ‘सरसेनापती हंबीरराव’मध्ये डबल रोल? चाहत्यांनी दिले संकेत

हॅण्डसम हंक अभिनेता गश्मीर महाजनी सध्या इमली या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. याशिवाय तो सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक सिनेमामध्ये दिसणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये गश्मीरचा एक अनोखाच अंदाज यावेळी दिसून आला. पण या ट्रेलरच्या कमेंट्समध्ये अनेक फॅन्सनी या सिनेमातील त्याच्या डबल रोलबाबत कमेंटस केल्या आहेत. गश्मीर या सिनेमात छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे.   

 

 

जर यात तथ्य असेल तर या दोन व्यक्तिरेखा एकाच सिनेमात साकारणारा गश्मीर हा पहिलाच मराठी अभिनेता असेल. विशेष म्हणजे सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा भव्य स्तरावर बनतो आहे. या सिनेमाचं बजेट जवळपास 12-13 कोटींचं असल्याचीही चर्चा आहे. गश्मीरच्या चाहत्यांना त्याच्या या भूमिकांबाबत औत्सुक्य असेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive