By  
on  

अभिनेत्री रुपाली भोसले आणि अभिषेक देशमुखने घेतली करोनाची लस

करोनाच्या भयानक प्रसारावर लसीची मात्रा काही अंशी का होईना प्रभावी ठरते आहे. त्यामुळे सगळ्यांचा कल करोना प्रतिबंधक लस घेण्याकडे आहे. अनेक कलाकारही स्वत: लस घेत आहेत. याशिवाय चाहत्यांना करोना लस घेण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. 

 

 

सामान्य व्यक्तीसह सेलिब्रिटीही करोना लस घेताना दिसत आहेत. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकारांनीही करोना प्रतिबंधक लस घेतली आहे. संजना साकारणारी रुपाली भोसले हिने कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे. तिच्यासोबत सहकलाकार अभिषेक देशमुख यानेही करोना प्रतिबंधक लस घेतली आहे. यावेळी रुपालीने फोटो पुरता मास्क काढला असल्याचं कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive