अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी गेल्या वर्षी ८ मे रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला वर्ष होताच दोघांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षय आणि योगिताला कन्यारत्न प्राप्त झाले. . योगिता ही ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळी यांची मुलगी आहे. त्यामुळे अरूण गवळी आजोबा झाले . चिमुकल्या गोंडस लेकीच्या आगमनाने गवळी आणि वाघमारे परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे.
अक्षय व योगिताने त्यांच्या मुलीचे नाव 'अर्णा' ठेवले आहे.
या फोटोमध्ये अरुण गवळी 'डॅडी' नातीला त्यांच्या मांडीवर घेऊन 'अर्णा' कडे पाहून हसत असल्याचं दिसत आहे. तिच्या आगमनाने त्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे.
अक्षय आणि योगिताला झालेल्या कन्यारत्नाच्या बातमीने चाहत्यांनाही आनंद झाला आहे.