By  
on  

Video : 'अशीही बनवाबनवी'वर मैत्रिणीसह थिरकला अज्या फेम नितिश चव्हाण

'लागीरं झालं जी’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली जोडी अज्या आणि शितली महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचले. कर्तव्यदक्ष सैनिक म्हणून सीमेवर लढणारा अजिंक्य हा पत्नी शितलीलासुध्दा जीवापाड जपायचा. अज्या साकारणारा अभिनेता म्हणजे नितिश चव्हाण हा खरंतर एक बेस्ट डान्सर आहे. अभिनयासोबतच डान्स म्हणजे त्याचा जीव की प्राण. त्याच्या डान्स व्हिडीओच्या अनेक नानाविवध स्टाईल त्याच्या इन्सस्टाग्रामवर पाहायला मिळतात. मालिका संपली तरी  सोशल मिडीयावर त्याचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. 

नितिश अनेकदा आपली मैत्रिण श्वेतासोबत अनेक धम्माल गाण्यांवर थिरकतो. ते पण कधी जिममध्ये तर गच्चीवर . आत्तासुध्दा श्वेता आमि नितिश गच्चीवर थिरकले आहेत आणि तेसुध्दा महाराष्ट्राच्या तुफान आवडत्या गाण्यावर म्हमजेच अशीही बनवाबनवीवर. अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मिकांत बेर्डे, सुशांत रे, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ यांच्या अफलातून अभिनयाने हा सिनेमा सजला. 

 

 

नितिशच्या डान्स व्हिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive