By  
on  

ओळखलंत का या प्रसिध्द मराठी अभिनेत्याला बॉलिवूडमध्येसुध्दा पाडलीय अभिनयाची छाप

मराठी मालिका, सिनेमे, नाटक आणि बॉलिवूडमध्येसुध्दा या अभिनेत्याने आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. अनेक लोकप्रिय मराठी सिनेमे व नाटकांमधून रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवणारा हा लाडका अभिनेता वास्तव या बॉलिवूड सिनेमात देढ फुटीया ही व्यक्तिरेखा साकारुन प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचला. हा अभिनेता म्हणजेच संजय नार्वेकर. विनोदी भूमिका साकारण्यात व त्या अचूक पेलण्यात संजय नार्वेकर यांचा हातखंडा.

 

. सोशल मिडीयापासून बरेच अलिप्त राहणारे संजय नार्वेकर यांनी त्यांचा एक लेटेस्ट फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. त्यात त्यांना ओळखणं फारच कठीण झालं आहे. 

हातात पुस्तक घेऊन खुर्चीवर निवांत वाचत बसलेले संजय नार्वेकर यांचा हा लेटेस्ट फोटो नेटक-यांमध्ये खुप व्हायरल होतो. दाढी वाढल्याने त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे. ते ह्या पोस्टला कॅप्शन देत  म्हणतात, " मोकळ्या वेळात पुस्तक वाचण हा सर्वोत्तम विरंगुळा आहे. सध्या मी Jeffrey Archer : A twist in tale नावाचं अप्रतिम पुस्तक वाचतोय.तुम्ही तुमचा मोकळा वेळ कसा बरं घालवता हे कमेंट करून सांगा" 

 

 

 

 

संजय नार्वेकर यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव तर केलाच आहे, सोबतच त्यांच्या प्रश्नाचं कॉमेंट्समधून उत्तरही दिलं आहे.  

नऊ महिने नऊ दिवस , टार्गेट - द लक्ष्य, अगं बाई अरेच्चा!, जबरदस्त, खबरदार, चेकमेट, आई नं. वन, येरे येरे पैसा हे संजय यांचे गाजलेले सिनेमे.      हिंदू हदयसम्राट बाळासाहेबांचा जीवनपट ठाकरे सिनेमातसुध्दा संजय नार्वेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. 

सर्वांनाचा आत्ता संजय नार्वेकर यांच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागून राहिली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive