By  
on  

सईने केलं ’इंडिया लॉकडाऊन’चं डबिंग , दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यासोबतचा फोटो केला शेअर

करोना महामारीमुळे देशावर भीषण संकट ओढवलं, करोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेने देशात हाहाहाकार माजवला. यामुळे सरकारने देशात लॉकडाऊनची घोषणा केली. या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या, काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हजारो किलो मीटर दुर राहणाऱ्या लोकांना तर घरी कुटुबियांकडे जाण्यासाठी पैसे आणि कुठलेही साधन नव्हते संपूर्ण शहरे बंद होती. हातावर पोट असलेल्या कामगारांची तर दुर्दशा झाली. 

आता याच सर्व परिस्थितीवर एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असणार आहे. प्रसिध्द बॉलिवूड दिग्दर्शक मधुर भांडारकर .’इंडिया लॉकडाऊन’  हा सिनेमा घेऊन येत आहेत. यात आपली मराठमोळी प्रसिध्द अभिनेत्री सई ताम्हणकर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. 

सईने नुकतंच या सिनेमाच्या डबिंगचं काम पूर्ण केलं. त्यावेळी मधुर भांडांरकर यांच्यासोबतचा हा डबिंग स्टुडिओतला फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. 
‘इंडिया लॉकडाऊन’सिनेमात सई सोबतच प्रतीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, अहाना कुमरा, जरीन शिहाब आणि प्रकाश बेलवाडी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सर्वांनाच या सत्य परिस्थितीवर आधारित सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive