By  
on  

Father’s day special: मराठी सिनेसृष्टीतील हे Star daddy आणि Star kids आहेत सुपरहिट

वडीलांचं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील स्थान अढळ असतं. आयुष्यातील या सपोर्ट सिस्टीमचं खास कौतुक करण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे.  बाबा, पप्पा, आबा किंवा आप्पा हाक मारायची पद्धत कोणतीही असो. त्यामागचा आदरयुक्त भितीचा आणि प्रेमाचा भाव कधीच बदलत नाही. लहानपणी हरेक हट्ट पुरवणारे बाबा आपण मोठे होईतो मित्र कधी बनतात समजतही नाही. मराठी सिनेसृष्टीतही बाप लेकांच्या जोड्यापैकी तुमची लाडकी जोडी कोणती ते जरुर सांगा

 

सचिन- श्रीया पिळगावकर : मराठी सिनेसृष्टीचे 'महागुरू' सचिन पिळगांवकर यांची लाडकी लेक श्रिया पिळगांवकरसुध्दा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन विश्वातील नवनव्या वाटा पादाक्रांत करत आहे. आधी परदेशी भाषांमधील शॉर्टफिल्म्सचं लेखन आणि दिग्दर्शन केल्यानंतर वडिलांच्याच 'एकुलती एक' या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारली व मराठी सिनेमात पदार्पण केलं. त्यानंतर ती नेहमी जाहिरांती आणि वेबसिरीजमधूनही झळकत असते. 

महेश- आदिनाथ कोठारे: मराठी, हिंदी चित्रपट, मालिका विश्वातील दिग्दर्शन, निर्मिती क्षेत्रातील मोठं नाव म्हणजे महेश कोठारे. त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारेदेखील याच क्षेत्रात एक यशस्वी अभिनेता म्हणून काम करतोय. आदिनाथने आजवर दिग्दर्शक, निर्माता म्हणून उत्तम काम केलं आहे. 

अनंत- क्षिती जोग: वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्षितीनेही अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. क्षिती आता 'चलचित्र कंपनी' च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत आहे. 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'झिम्मा' या सिनेमाच्या निर्मितीची धुरा क्षिती सांभाळत आहे.

उदय- स्वानंदी टिकेकर: कलासक्त वातावरण असलेल्या घरी स्वानंदी मोठी झाली आहे. पण स्वानंदी वडिलांकडून मिळालेला अभिनयाचा वारसा जपण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘दिल दोस्ती दोबारा’ मालिकांतून लोकप्रिय झालेली स्वानंदी टिकेकर आता  ‘अस्सं माहेर नको गं बाई, मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

सुनील- शुभंकर तावडे: वडिलांप्रमाणेच शुभंकरनेही विविध भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. शुभंकरने रंगभूमीपासून करिअरला सुरुवात केली. आजवर त्याने सिनेमा, मालिका, वेबसिरीज या प्रकारात अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive