By  
on  

अभिनेता सुयश टिळकने त्याच्या या सहकलाकाराचं केलं कौतुक

शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये शंतनू आणि शर्वरी अखेर लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. यांचा विवाह सोहळा आनंदात पार पडणार आहे.  दोघांचे लग्न पारंपारिक पध्दतीने पार पडणार असून प्रत्येक विधीला साजेसा असा उखाणा देखील घेणार आहेत. सप्तपदी जरा विशेष असणार आहे, कारण शंतनू शर्वरीला उचलून फेरे पूर्ण करणार आहे. पण या सगळ्यात एक खास गोष्ट असणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

 

या लग्नासाठी शर्वरीची वहिनी साकारत असलेली अर्चना निपाणकर मंगलाष्टक गाताना दिसणार आहे. याबाबत बोलताना सुयश म्हणतो, ‘ मी हीला का रे दुरावा मधली जुई म्हणून लक्षात ठेवलं होतं. हा तिचा पहिलाच शो होता. त्यामुळे ती लाजाळू आणि बुजरी होती. मला तिच्या गायन टॅलेंटबाबत काहीच माहिती नव्हतं. पण गणेशोत्सवात तिने एक गाणं सादर करुन आमचं मन जिंकलं होतं. 
त्यानंतर जवळपास सात वर्षांनी मी तिला पाहतो आहे. आता तिचा कॉन्फिडन्स कौतुक करण्याजोगा आहे. शुभमंगल ऑनलाईन मध्ये तीनी ह्या वेगळ्या मंगलाष्टका गायल्या कुठल्याही साथसंगत किंवा तालमीशिवाय त्यासाठी तिचं कौतुक आहे.’ हे कॅप्शन देत सुयशने व्हिडियोही शेअर केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive