By  
on  

Photos : ..म्हणून अप्सरेला साजरी करता आली नाही वटपोर्णिमा

पतीच्या दिर्घाआयुष्यासाठी वटपोर्णिमा साजरी करण्याला महाराष्ट्रीयन संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. वडाला सात फे-या घालून जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना सुवासिनी करतात. नवीन लग्न झालेल्या नवपरिणीत सुवासिनींसाठी पहिली वटपोर्णिमा तर खासच असते. 

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी मे महिन्यात फियान्से कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली. दुबईत हे लग्न अगदीच मोजक्या चार-पाच लोकांच्या उपस्थितीत पार पडलं.

"आज वटपौर्णिमा… माझी पहिलीच, जरी साजरा करता येत नसली तरी…. जरा नटावं म्हणलं… बाकी नवऱ्याला उत्तम, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना... 'वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा' ता.क.- कारण येथे वटवृक्ष नाही" असं कॅप्शन देत सोनालीने हे फोटो शेअर केले आहेत.

 

सध्या कुणाल आणि सोनाली दुबईतच त्यांच्या फ्लॅटमध्ये रहातायत. या लॉकडाऊनच्या काळात बोहल्यावर चढलेली सोनाली पतीसोबत क्वालिटी टाईम एन्जॉय करतेय.

नवविवाहिता  सोनाली या लाल रंगाच्या साडीत लई भारी दिसतेय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive