By  
on  

या मराठी अभिनेत्रीच्या रुग्णालयातील व्हिडीओंनी वेधलं चाहत्यांंचं लक्ष

'आंबट गोड', 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकांमध्ये झळकलेली प्रसिध्द अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केतकी तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच नेटक-यांच्या निशाण्यावर असते. तिला नेहमीच ट्रोल केलं जातं. ती विचार न करता बेफाम आणि बेताल वक्तव्य करत असल्याने नेहमीच चर्चेत राहते. टीकेची धनी होण्याची केतकीची पहिली वेळ नाही तिला नेटकरी सतत खडे बोल सुनवत असतात. पण तरीसुध्दा ती आपल्या वादग्रस्त पोस्ट शेअर करतच असते. 

सोशल मिडीयावर केतकी सतत सक्रीय असते. नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओंमुळे् केतकी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्हालासुध्दा आश्चर्यच वाटेल. 

गेल्या काही वर्षापासून केतकी एपिलिप्सीवर गेली अनेक वर्ष मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे. तसंच याबाबत ती सतत इन्स्टाग्रामवरुन जनजागृती करतानासुध्दा दिसते. या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओज ती स्वत: शेअर करताना दिसते. पण नुकतच तिने शेअर केलेल्या व्हिडिओत ती इलेक्ट्रीक शॉक घेत असल्याचं दिसून आलंय.

 

 

एपिलिप्सी स्विकारा असंही ती आपल्या प्रत्येक पोस्टमधून सांगत असेत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive