By  
on  

‘सा रे ग म प..’मधील ओव्हर एक्टींगवरुन डिवचणा-या ट्रोलरला मृण्मयी म्हणते..

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे नवीन पर्व दोन आठवड्यांपूर्वी झी मराठी वाहिनीवर सुरु झाले. या पर्वाची खासियत म्हणजे या पर्वात परिक्षक म्हणून यापूर्वीच्या ‘सा रे ग म लिटिल चॅम्प’च्या पर्वामधून अफाट प्रसिद्धी मिळवलेल्या पंचरत्नांना परिक्षकपदी विराजमान झाले आहेत. 

रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर या पंचरत्नावर या पर्वामध्ये लिटिल चॅम्प्सच्या गाण्याचं परिक्षण करण्याची मोठी जबाबदारी आहे. तर  या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिध्द अभिनेत्री मृण्मयी देशपांडे करत आहे. एकीकडे लिटिल चॅम्पला पुन्हा पाहण्याची संधी मिळालेली असतानाच दुसरीकडे या पर्वातील परिक्षक व सूत्रसंचालक यांच्यावर खुप मीम्स व्हायरल होत आहेत. 

सूत्रसंचालन करणाऱ्या मृण्मयीच्या शैलीची खिल्ली उडवणारे मिम्स व्हायरल झालेत. असं असतानाच मृण्मयीने ट्रोलर्सला  सडेतोड उत्तर दिलं आहे आणि आपल्या प्रश्नाने त्याची बोलतीच बंद केली आहे. 

 

मृण्मयीच्या एका पोस्टवर एका चाहत्याने सा रे ग म प लिटिल चॅम्पसंदर्भातील कमेंट केली. ‘समोर बसलेले जज आणि अँकर खूपदा वा वा ओरडतात याला ओव्हर अ‍ॅक्टींग म्हणायची का?,’ असं या चाहत्याने मृण्मयीच्या पोस्टवर कमेंट करुन म्हटलं. या कमेंटवर मृण्मयीने सडेतोड उत्तर दिलं आहे. “तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं? हाताची घडी घालून शांत बसला असतात का?,” असा प्रश्न तिला ट्रोल करु पाहणाऱ्या व्यक्तीला तिने केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive