By  
on  

प्रिया बापट म्हणते, ‘भारतात काय फक्त मराठीच बोलतात?’

महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. पण महाराष्ट्रात विविध भाषा बोलणारे लोकही एकत्र असल्याने इतर भाषांचा वापरही सर्रास होताना दिसतो. पण नुकताच सोशल मिडियावर मराठी आणि हिंदी असा वाद दिसून आला. याला कारण ठरली प्रिया बापटची अ‍ॅड. प्रिया उमेशसोबत नुकतीच एका अ‍ॅडमध्ये दिसली. अ‍ॅड सोशल मिडियावर व्हायरल होताच हिंदीमध्ये असल्याने अनेक नेटकऱ्यांनी प्रियाला ट्रोल करायला सुरुवात केली.

 

 डोंबिवलीत बहुतांश मराठी माणसं राहतात तरीही मराठीला वगळून हिंदी भाषेत अ‍ॅड असल्याबद्दल नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर प्रियानेही ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलं आहे. प्रिया म्हणते, ‘डोंबिलीत घर काय फक्त मराठी माणसंच घेतात का? माझी मातृभाषा मराठी आहे म्हणजे भारतात फक्त मराठीच बोलतात का? मग तुम्ही हिंदी चित्रपट, इंग्रजी वेबसीरिज का बघता? एकीकडे मराठी कलाकरांना सतत विचारायचं तुम्ही हिंदीत काम का करत नाही आणि दुसरीकडे जर सगळ्यांना समजेल अशा भाषेत जाहिरात केली तर असे टोमणे मारायचे. तुमच्या दुटप्पीपणाचं दुःख वाटतं.'   प्रियाच्या या भूमिकेला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. तर अनेकांनी तिच्या विरोधात कमेंट केली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive