By  
on  

स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवर प्रवीण तरडेंची संतप्त प्रतिक्रिया

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही मुलाखत लांबल्याने तसेच आर्थिक परिस्थितीमुळं स्वप्निल सुनील लोणकर या तरुणानं आत्महत्या केली. या आत्महत्येचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. अनेक सेलिब्रिटींनीही यावर संताप व्यक्त केला आहे. अभिनेते प्रवीण तरडे यांनी तीव्र शब्दात राजकारण्यांविरोधात निषेध नोंदवला आहे. 
एका मुलाखतीमध्ये प्रवीण म्हणातात, ‘राजकारणासंबधी चर्चा रोज ऐकू येत आहेत. या सगळ्यासाठी राजकारण्यांकडे वेळ आहे. पण मुलांच्या नोकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. देशभरात हेच सुरू आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणासाला जगण्याचा अधिकार नाही का?' असा सवाल तरडे यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, 'चुकिच्या माणसांना आपण देशाचे आणि राज्याचे आयडल करून बसलो मग निष्पाप तरुण मरत राहणार. एमपीएससी- युपीएससी करणारे मरणार, शेतकरी मरणार, कलाकार मरणार, लेखक मरणार. काल एक कला दिग्दर्शक मेला. ते सगळे मरणार आणि फक्त राजकारणी जिवंत राहणार. यावेळी प्रवीण यांनी संयमाने वागण्याची विनंती केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive