By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सिंपल में डिंपल लुक्सने जिंकली चाहत्यांची मनं

महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मे महिन्यात फियान्से कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली. दुबईत अगदी मोजक्या पाच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यानंतर लॉकडाऊनमुळे सोनाली कुणालसोबतच दुबईतील त्यांच्या फ्लॅटमध्ये सुखी संसार करत होती.

दरम्यान त्यांनी आफ्रिकेत मिनीमूनसुध्दा साजरा केला. पण आता सोनाली दोन-तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मायदेशी परतलीय आणि सर्व पेंडींग कामं पूर्ण करण्याला तिने सुरुवात केली आहे. 

 

मी भारतात परतल्या परतल्याच खुप बिझी झालीय असं म्हणत सोनालीने तिचे काही रिफ्रेशिंग मूडमधले फोटो शेअर केले आहेत. पण करोना संकटामुळे अडकलेली कामं मार्गी लागतायत याचा तिला अत्यंत आनंद होतोय. 

 

आगामी सिनेमातील सोनालीचा हा उर्मिला रानडे या व्यक्तिरेखेतील हा लुक आहे. 

 


 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive