By  
on  

रेव्ह पार्टीप्रकरणी अभिनेत्री हीना पांचाळच्या अडचणीत वाढ

 ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळला हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर पोलिसांनी अटक केली होती.  सोमवारी रेव्ह पार्टीतील 25 आरोपींना इगतपुरी न्यायालयात हजर करण्यात आले असता हीनासह 20 जणांचा जामीन फेटाळत त्यांना 7 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  

 

 

या पार्टीत हीनासह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरीतील बंगल्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी हे तरुण कलाकार बेधुंद असताना छापा टाकला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive