मालिका विश्वात दीप्ती केतकर हे नाव चांगलंच प्रसिध्द आहे. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये दीप्तीने महत्त्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. येऊ कशी तशी मी नांदायला या लोकप्रिय मालिकेतील स्विटूची आई नलू साळवी या व्यक्तीरेखेतून दीप्तीने आपली नवी ओळख घराघरांत निर्माण केली आहे.
दीप्तीला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती.
दीप्तीने नालंदा नृत्यकला महाविद्यालयातून कला शाखेमध्ये पदवी मिळवली. ती एक उत्तम नृत्यांगना आहे.
अभिनय, नृत्य आणि सौंदर्य याच्या जोरावर दीप्तीने आपलं स्थान अबाधित ठेवलं आहे.
'अवघाची संसार' या मालिकेतून दीप्तीने छोटया पडद्यावर पदार्पण केले. पदार्पणाच्या मालिकेतच तिला मोठे यश मिळाले. या मालिकेत तिने शारदा राजे ही छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली होती. प्रसाद ओक या मालिकेत मुख्य भूमिकेत होता.
पण तिला खरी लोकप्रियता 'मला सासू हवी' मालिकेतील अभिलाषाच्या भूमिकेतून मिळाली.
दीप्तीने भरतनाटयममध्ये मास्टर्स केले आहे. त्यामुळेच तिने एका पेक्षा एक सीजन ७ डान्स शो ची ऑफर स्वीकारली.
'हम तो तेरे आशिक है' या विनोदी मालिकेत दीप्तीने कावेरी वहिनींची भूमिका साकारली होती. या मालिकेत कावेरी हे पात्र कोल्हापूरचे दाखवण्यात आले.
तर 'भागो मोहन प्यारे' या मालिकेत मोहनच्या बॉस गोडबोले बाईंची व्यक्तिरेखा दीप्तीने साकारली होती.
दीप्ती विवाहीत असून तिला एक लहान लेक आहे. तिने लेकीसोबत अळी-मिळी गुपचिळी या कार्यक्रमातसुध्दा हजेरी लावली होती.