By  
on  

“स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या… ही स्त्री जातीची शोकांतिका”; गरोदरपणात ट्रोल होणा-या अभिनेत्रीची पोस्ट

 अभिनेत्री हेमांगी कवीच्या 'बाई ब्रा आणि बुब्स' ह्या लेखाची जोरदार चर्चा सुरु असतानाच. मराठीतील एका गरोदर अभिनेत्रीने आपल्या सोशल मिडीया पोस्टवरुन गरोदरपणात आपल्याला कसं ट्रोल केलं जातं, हे सांगितलं आहे. 

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने पतीसोबत एक खास फोटोशूट करत आपण आई होणार असल्याची गुड न्यूज काही महिन्यांपूर्वी चाहत्यांना दिली होती. उर्मिला निंबाळकर ही अभिनेत्री सोबतच एक फॅशन डिझायनर देखील आहे. तिचा स्वतःचा यूट्यूब चॅनल  आहे . चाहत्यांना ती नेहमी खास  टिप्स देत असते आणि तिचा आता प्रेग्न्सेन्सीमधला खास vlog देखील ती पोस्ट करत असते. त्यालासुध्दा प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळते. तिचं युट्यूब चॅनेल खुपच लोकप्रिय आहे. उर्मिला गरोदरपणातला प्रत्येक क्षण किती सुखद असतो याची अनुभूती घेत अ्सते आणि चाहत्यांपर्यंत ती फोटो, पोस्टच्या माध्यमातून पोहचवते. 

सध्या तिने गरोदरपणातील काही फोटो पोस्ट केल्यानंतर महिलांकडूनच तिला ट्रोल केलं जात असल्याचं कमेंट सेक्शनमध्ये दिसत आहे. मात्र नुकतीच तिने एक पोस्ट शेअर करत या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत हे फोटो का काढते याबद्दल सांगितलंय.

 

 

सोशल मीडियावर उर्मिलाला ट्रोल करताना वापरल्या जाणाऱ्या कमेंटमधील मजकूर लिहीत तिने पोस्ट लिहली आहे.. “‘आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?’, ‘एवढं काय हिचं प्रेगन्सीचं कौतुक?’, ‘कोणाला काय पोटं येत नाहीत का?’, मागच्या नऊ महिन्यात या सगळ्या कमेंट्स, मला स्त्रीयांनीच पाठवल्यात स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही, ही स्त्री जातीची शोकांतिका आहे,” असा टोला उर्मिलाने पोस्टच्या सुरवातीलाच लगावला आहे. पुढे लिहिताना ती म्हणते, “पण एक स्त्री म्हणून मी इतर स्त्रीयांना सांगेन, जेवढे हे क्षण टिपतां येत असतील, तेवढे टिपून घ्या. या संपुर्ण प्रवासाचा खुप आनंद लूटा. हे सुंदर, जादुई क्षण अतिशय पटकन संपून जातात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत. (त्यासाठी डायरेक्ट दुसरं बाळ जन्माला घालावं लागतं) मला तर विश्वासच बसत नाहीय की, माझा नववा महिना सुद्धा संपायला आता काही दिवसंच राहिलेत. आनंद, उत्साह आणि फक्त या दिव्य व्यवस्थेचे निरीक्षण करत मी कृतज्ञता व्यक्त करत आहे.”

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive