सैराट सिनेमाने अवघ्या मराठी सिनेसृष्टीलाच नाही तर बॉलिवूडलासुध्दा वेड लावलं. या सिनेमाचा साधा-सुधा नायक परश्या साकारुन अभिनेता आकाश ठोसरने सर्वांचीच मनं जिंकली. परश्या हीच त्याची ओळख बनली. पण आता तो त्याची नवी ओळख प्रस्थापित करु पाहतोय.
अनेक हिंदी सिनेमे, वेबसिरीज आणि जाहिरांतीमधून परश्या फेम आकाश चमकतो. एवढंच नाही तर सैराटच्या वेळेचा आकाश आणि आत्ताचा आकाश यात प्रचंड फरक आहे. त्याने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केल्याचं पाहायाला मिळतंय. तो त्याच्या लुक्सवर खुपच मेहनत घेताना दिसतो. आता आकाश पुन्हा त्याच्या लॉंग हेअर लुकमध्ये परतला आहे.
आकाशने त्याचे ल़ॉंग हेअर पोनी टाय केले आहेत. त्यामुळेच त्याचा हा लुक जबरदस्त दिसतोय.
ह्यात आकाशने त्याचा पॉवफेक्ट लुक शेअर केला आहे.
नदी किना-यावरचे लाडक्या श्वानासोबतचे सुखद क्षण आकाशने शेअर केले आहेत.
आकाशच्या या नव्या लुकवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
सोशल मिडीयावर आकाश सतत सक्रीय असतो. आपले अनेक व्हिडीओ, फोटो आणि इतर अपडेट्स तो चाहत्यांशी शेअर करतो. आकाश प्रचंड फिटनेस फ्रिक आहे,