By  
on  

‘दिल दोस्ती दुनियादारी’ चं हे त्रिकुट नवीन प्रोजेक्टसाठी पुन्हा एकत्र

मालिका संपून वर्षं लोटली तरी झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेचे अनेक फॅन्स आहेत. मालिकेतील कैवल्य, सुजय, आशू, अ‍ॅना, मीनल, रेश्मा, राकेश, निशा, किंजल  या व्यक्तिरेखांनी प्रत्येकाच्या मनात घर केलं. आज मालिका संपून इतकी वर्ष झाली तरी ह्या व्यक्तिरेखा, यातील कलाकार आणि त्यांचे संवाद सर्वांच्याच स्मरणात आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sula (@suvratjoshi)

 

या मालिकेतील तीन अतरंगी व्यक्तीरेखा पुन्हा एकत्र दिसणार आहेत. सुजयच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता सुव्रत जोशीने नुकतीच याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ‘काहीतरी नवीन करण्यासाठी पुन्हा एकत्र.’ हे कॅप्शन देत सुव्रतने ऋचा आपटे आणि अमेय वाघसोबत फोटो शेअर केले आहेत. अमेय आणि सुव्रत यापुर्वी अमर फोटो स्टुडियो या नाटकात दिसले आहेत. हे दोघं आता आगामी कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसतात हे लवकरच समजेल

Recommended

PeepingMoon Exclusive