By  
on  

गायिका प्रियांका बर्वेसोबत या छोट्या पाहुण्याने लावली रेकॉर्डिंगला हजेरी

गायिका प्रियांका बर्वेने नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोसाठी सोशल मिडियावर तिचं कौतुकही केलं जात आहे. या व्हिडियोमध्ये प्रियांका स्टुडियोमध्ये गाणं गाताना दिसते आहे. विशेष म्हणजे या रेकॉर्डिंगला प्रियांकाचा मुलगा युवानही दिसतो आहे. प्रियांका गाणं गाताना युवान अगदी शांतपणे तिच्या मांडीवर बसला आहे.

 

 

हा व्हिडियो व्हायरल झाला असून नेटिझन्स कौतुकही करत आहेत. अभिनेत्री, गायिका प्रियांका बर्वे सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत चाहत्यांशी शेअर करत असते. मागील वर्षी ऑगस्टमध्ये प्रियांकाने आई झाल्याची गोड बातमी दिली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive