‘लागिरं झालं जी’, टोटल हुबलाक, युवा डांसिंग क्वीन यामधून अदाकारीचा जलवा दाखवलेली अभिनेत्री म्हणजे पुर्वा शिंदे. अभिनेत्री पुर्वा शिंदेचं सोशल मिडिया फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. सध्या तिच्या सोशल मिडियावरील एका पोस्टने लक्ष वेधलं आहे. पुर्वाने मराठी साजात डान्सचा एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये ती बाजीराव मस्तानी मधील पिंगा या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. पुर्वा एक उत्तम नृत्यांगना आहे. तिच्या या नृत्याचंही चाहते कौतुक करताना दिसत आहेत.