'कोण होणार करोडपती' च्या सेटवर यावेळी नाना पाटेकर यांनी हजेरी लावली. नाना पाटेकर यांनी मंचावर अनेक आठवणींना उजाळा दिला. कधीही न पाहिलेले नाना प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहेत. फार कमी लोकांना माहीत असेल.
कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन सामाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात.
या कार्यक्रमात नानांनी एक हृदयस्पर्शी किस्सा शेअर केला आहे. आपल्या वडिलांच्या आठवणी शेअर केल्या आहेत. ‘माझ्या वडिलांना नाटक आणि सिनेमाचं फार कौतुक होतं. अनेकदा ते मला तमाशाला घेऊन गेले आहेत. त्या कलाकारांचा अभिनय पाहा असे ते म्हणायचे. त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये माझी आर्थिक स्थिती ढेपाळली होती. ज्यावेळी ते आजारी होते तेव्हा नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ते गेले. आमच्याकडे औषधालाही पैसे नसायचे. मंगेश आणि मी शेवटी केईएम हॉस्पिटलच्या इथे बाहेर एका दुकानाच्या पायरीवर बसलो होतो. तेव्हा वडील आतमध्ये जनरल वॉर्डमध्ये होते’ असे नाना म्हणाले.