By  
on  

बाबा आई आली…!! पाहा रितेश आणि मुलांचा हा धम्माल व्हिडीओ

अभिनेता रितेश देशमुख सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुखसोबतचे धम्माल रील व्हिडीओ शेअर करत नेहमीच चाहत्यांची वाहवा मिळवतो. बॉलिवूडमधल्या या लाडक्या कपलचे व्हिडीओ पाहण्यासाठी नेटकरी नेहमीच आसुसलेले असतात. नुकताच पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर करत सोशल मिडीयावर रितेश भाव खाऊन गेलाय. पण हा व्हिडीओ नेहमीप्रमाणे जेनेलियासोबत नाही तर मुलांसोबत आहे. तुम्हीपण तो पाहिल्यावर खळखळून हसत रहाल. 

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश आणि त्याची दोन्ही मुलं दिसतं आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला एक गाडी जोरात येते आणि दुसऱ्या गाडीला जोरात धडक देते. त्यानंतर रितेशची दोन्ही मुलं बोलतात बाबा आई आली…आणि रितेश त्यावेळी रुबिक्स क्युब खेळत असतो. त्याची मुलं त्याचा जवळ जाऊन बोलतात तिने तुझ्या गाडीला धडक मारली आहे असं म्हटल्यानंतर रितेशचे हावभाव हे बघण्यासारखे आहेत  तर बॅकग्रांऊडला ओम शांती ओमचं ...छन सें जो तुटे कोई सपना हे गाणं लागलंय.. हा व्हि़डीओ शेअर करत ‘बाबा आई आली !!!!’ असे कॅप्शन रितेशने दिले आहे. त्याचा हा विनोदी व्हिडीओ पाहून त्याच्यावर सेलिब्रिटींपासून चाहत्यांनी ही कमेंटचा वर्षाव केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सध्या रितेश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ट्रिलॉजीवर काम करतोय. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी नागराज मंजुळे यांच्यावर आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive