आईच्या प्रेमाला तोड नसते. ते शुद्ध, निरपेक्ष आणि चिरंतन असते. तुम्ही कितीही मोठे झालात किंवा कितीही दूर गेलात, तरी ती कोणत्याही सीमा पार करून तुमच्यावर प्रेम करत असते. अशीच एक आई, जी आपल्या परिचयाची आहे, ती म्हणजे, ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, प्रत्यक्षात एका मुलीची आणि पडद्यावर एका मुलाची आई आहे. कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी मालिकेत त्यांनी साकारलेल्या ईश्वरीमध्ये एका वेगळ्या छटेची आई दिसते. पडद्यावर आई साकारताना आणि प्रत्यक्षात मातृत्वाचा अनुभव घेताना काय वाटते, याबद्दल सुप्रिया व्यक्त झाल्या आहेत.
मालिकेत ईश्वरी ही व्यक्तिरेखा साकारणा-या सुप्रिया पिळगांवकर सांगतात, “एक आई म्हणून ईश्वरी आपल्या मुलांवर सारखेच प्रेम करते, पण आपणा सर्वांना माहीतच आहे की, देव (शहीर शेख) कडे तिचा विशेष कल आहे. आपल्या आणि आपल्या मुलाच्या नात्यात ती कोणालाच येऊ देत नाही. माझ्या मते, प्रेम आणि काळजी दाखवण्याची प्रत्येक आईची आपली खास पद्धत असते. शेवटी एका आईची इच्छा आपल्या मुलाने आनंदात असावे आणि जीवनात त्याची भरभराट व्हावी हीच तर असते. देवबद्दल ईश्वरीला हेच वाटत असते.”
याबद्दल त्या पुढे सांगतात, “मला एक मुलगी आहे आणि तिने आई म्हणून माझी निवड केली याबद्दल मला कृतज्ञता वाटते. तिच्या बाबतीत मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे. ती जे निर्णय घेते, त्यात मी तिच्यावर विश्वास ठेवते आणि तिला आधार देते. ती एक सुंदर आणि स्वतंत्र स्त्री झालेली पाहताना मला खूप आनंद होतो. आपल्याला हे माहीत असते की एक ना एक दिवस आपली मुले पाखरासारखी घरट्यातून उडून जाणार आहेत, पण तरीही एका आईसाठी ती मुले नेहमीच लहानच असतात.”
कथानकात आत्ता एका मोठ्या सत्याचा उलगडा झाला आहे आणि संपूर्ण दीक्षित कुटुंबाला त्यामुळे हादरा बसला आहे. एक कुटुंब म्हणून त्यांच्यात काय घडते हे येत्या भागात समजेलचय
कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी, दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर