By  
on  

'घाबरतील लहान मुलं..' , नव्या फोटोशूटमुळे श्रृती मराठे झाली ट्रोल

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ अभिनेत्री श्रृती मराठे साधते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी श्रृती नेहमीच तिचे विविध फोटोशूट  चाहत्यांशी शेअर करते. आत्तासुध्दा श्रृतीने तिचं एक जबरदस्त फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. पण या फोटोशूटमुळे ती खुप ट्रोल होतेय. 

या ग्रीन कलरच्या ब्लेझर लुकमध्ये श्रृती खुपच रुबाबदार दिसतेय. 

 

पण या लुकवरचा श्रृतीचा मेकअप आणि तिच्या जरा हटके आयशॅडो यामुळे नेटिझन्सी तिला ट्रोल करायला सुरुवात केलीय. 

 

 

घाबरतील लहान मुलं... , चुना लावला आहे वाटतं..., मेकअपचा उतका थर लावण्याची गरज आहे का.... अशा प्रकारच्या कॉमेंट्स श्रृतीच्या या नव्या फोटोशूटवर नेटिझन्सनी केल्या आहेत. 

आत्तापर्यंत श्रृतीच्या या फोटोशूटवर 30 हजारहून अधिक लोकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

 

उत्तम अभिनयासोबतच श्रुती मराठेच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.

 

Recommended

PeepingMoon Exclusive