कलाकारांची सगळ्यात मोठी कमाई त्यांची संपत्ती नाही तर चाहत्यांचं प्रेम असतं. असाच अनुभव अभिनेत्री अश्विनी महांगडेला नुकताच आला. अश्विनीने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामधील फोटोत तिच्यासोबत तृतीयपंथीय दिसत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अश्विनी म्हणते, ‘स्थळ - खेड- शिवापूर टोल नाका समोरून - ही सेम राणूआक्कांसारखी दिसतेय न. सज्जू - आहो त्याच आहेत.
आणि मग फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम. आडनावांवरून जात समजावी एवढी मोठी अजून झाले नाही. पण चेहऱ्यावरून स्वभाव समजेल एवढी नक्कीच झालेय.जात, धर्म, लिंग यापलीकडे फक्त माणुसकी जपावी हे नानांनी शिकवले. आणि तसेही आमचे नाते कलाकार आणि रसिक माय-बाप हे आहेच की.’ अश्विनी सध्या ‘आई कुठे काय करते’ मध्ये अनघाच्या भूमिकेत दिसते आहे. या भूमिकेचं प्रेक्षक कौतुक करताना दिसत आहेत.