By  
on  

आणि माध्यमांच्या चुकांमुळे उमेश कामतला झाला विनाकारण मन:स्ताप

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्गा याला पॉर्न फिल्मस बनविण्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. ह्या प्रकरणाने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडालीय. या प्रकरणात सध्या एक नाव भलतंच गाजतंय ते म्हणजे उमेश कामत याचं. राज कुंद्राचा सहकारी म्हणून उमेश कामतला अटकही झालीय. ह्या नावाचा आणि आपला मराठमोळा प्रसिध्द अभिनेता उमेश कामतचा नावातील साधर्म्यासह कुठलाही संबंध नाही. पण अनेक माध्यमांनी ब्रेकिंग न्यूज देताना कुठलीही शाहनिशा न करता अभिनेता उमेश कामतचा फोटो या बातमीत सरळ वापरुन टाकला आहे. यामुळेच विनाकारण प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावं लागलं. 

 

सध्या उमेश कामत ‘अजून ही बरसात’ आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  बुधवारी या मालिकेच शूटिंग करत असतानाच सेटवर उमेशला फोन आणि मेसेज आले. त्याला या प्रकाराने खुपच त्रास भोगावा लागला. 

 

तसचं माध्यमांनी चुकिचा फोटो वापरत बातम्या दिल्यानंतरही चूक न सुधारता कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त न केल्याची खंत उमेशने  एका वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केली. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive