देशभरात करोनाचे संकट आपला पिच्छा सोडत नाही आहे. टांगत्या तलवारीप्रमाणे हे संकट अदयापही आपल्यावर आहे. याचा परिणाम हा सण आणि उत्सवांवर दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर एकत्र जमून उत्साहात सण उत्सव साजरे करण्यावर सरकारने खबरदारी म्हणून बंदी आणली आहे. साधेपणानेच सर्व सण उत्सव साजरे करावे लागत आहेत.
यासगळ्यात यंदा करोना लसीकरण सुरु झाल्यानंतर आता मनसेनं दहीहंडी जल्लोषात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. यंदा ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यानंतर अभिनेता प्रविण तरडेने यावर कमेंट केली आहे.
मनसे नेते अभिजित पानसे यांनी फेसबुक पोस्ट करून हे जाहीर केलं आहे. अभिजित यांनी ही पोस्ट फेसबुक अकाऊंटवरून शेअर केली आहे. “विश्वविक्रमी दहीहंडी ३१ ऑगस्टला होणार”, असं म्हटलं आहे. यावर आता प्रविण तरडेने “१०० टक्के नाचायला येणार” कमेंट केली आहे.
ही कमेंट पाहताच त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. प्रविण तरडेने मनसेच्या दहीहंडिला पाठिंबा दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.