अभिनेते भरत जाधव यांनी उमेश कामतच्या समर्थनार्थ शेअर केली पोस्ट

By  
on  

काही दिवसापासून उद्योगपती राज कुंद्रा यांच्याविषयीच्या बातम्यांना सोशल मिडियावर उधाण आलं आहे. पण हिंदी चॅनेल्सकडून या बातम्या दाखवताना चुक घडली आहे. हिंदी वाहिन्यांनी अकारण राज यांच्याबातमीसोबत उमेश कामतचा फोटो दाखवला. उमेशने या प्रकरणाबाबत संताप व्यक्त करत कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. उमेशच्या समर्थनार्थ अभिनेते भरत जाधव यांनीही पोस्ट शेअर केली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

ते म्ह्णतात, ‘काल राज कुंद्रा प्रकरणातील एका तथाकथित आरोपी उमेश कामत च्या जागी कुठलीही शहानिशा न करता केवळ नाम साधर्म्यमुळे हिंदी वृत्तवाहिन्यांनी मराठी कलाकार उमेश कामत यांचा फोटो लावून बदनामी केली आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या वैयक्तिक, व्यावसायिक व सामाजिक हानीसाठी या वृत्त माध्यमांना जबाबदार धरले जायला हवे. या जबाबदार वृत्त वाहिन्यांनी आपली चूक लक्षात आल्या नंतर उमेश कामत यांची निदान जाहीर माफी मागण्याचे सौजन्य दाखवावे.’

Recommended

Loading...
Share