By  
on  

अमेय वाघने त्याच्या जीवलग ‘ब्रोच्या’ला या अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिग्दर्शक, अभिनेता निपुण धर्माधिकारीचा आज वाढदिवस आहे. निपुणचा जवळचा मित्र अभिनेता अमेय वाघनेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अमेयने निपुणसोबतच्या फोटोंचा एक व्हिडियो शेअर केला आहे. स्वभाव त्याचा खट्याळ , अदा त्याची न्यारी …जीवलग हा ब्रोच्या ज्याचं नाव @nipundharmadhikari !’ हे धमाल कॅप्शन देत त्याने हा व्हिडियो शेअर केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

 

या पोस्टवर निपुणनेही कमेंट केली आहे. तो म्हणतो, अरे भावा हसता हसता रडवतो का काय आता? <3 <3 <3 (तुझ्याकडे फारच फुटेज दिसतंय माझं. पुढच्या वेळेस भेटलास की जरा फोन दाखव तुझा अनलॉक करून) नेटिझन्सनीही या व्हिडियोचं कौतुक करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive