By  
on  

साज ह्यो तुझा ! अप्सरेच्या दिलखेचक अदाकारीवर चाहते फिदा

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसाठी शेयर करते. नुकतच सोशल मिडीयाच्या माध्यमातूनच सोनालीने तिच्या लग्नाची बातमी शेयर केली होती. 7 मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत लगीनगाठ बांधल्याची गुड न्यूज तिने चाहत्यांना दिली होती. 

मोहक सौंदर्य, नृत्य कौशल्य आणि दमदार अभिनय यांच्या जोरावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मनोरंजन विश्वातील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रत्येक कामात वैविध्य असणाऱ्या, त्यात नाविन्य आणण्याचा सोनालीचा प्रयत्न असतो.

सोनालीचा नथ आणि जरीच्या साडीतला हा साजश्रृंगार पाहून तुम्हीही घायाळ व्हाल. 

 

ह्या लाल आणि गोल्डन रंगातल्या पैठणीत सोनालीचं सौंदर्य खुलून दिसतंय, 

 

Recommended

PeepingMoon Exclusive