'गोव्याच्या किना-यावर' फेम अभिनेत्रीचं ठरलं लग्न, पाहा Photos

By  
on  

'गोव्याच्या किना-यावर' या तुफान लोकप्रिय अशा गाण्यात सुह्रद वार्डेकर आणि सिध्दी पाटणे ह्या क्यूट जोडीची जबरदस्त रोमॅंण्टीक केमिस्ट्री पाहायला मिळाली. या रोमॅण्टिक व्हिडीओने अफाट लोकप्रियता मिळवली.  यातील अभिनेत्री सिध्दी पाटणेचं खुप कौतुक झालं. सिध्दीचा खुप मोठा  चाहतावर्ग आहे. सोशल मिडीयावर ती सतत सक्रीय असते. सध्या सिध्दी स्टार प्रवाहवरील सांग तू आहेस का या मालिकेत शांभवी ही भूमिका साकारत आहे. 

 अभिनेत्री सिद्धी पाटणे  लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री सिद्धी पाटणे हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी तिचा होणारा नवरा विशाल दलाल यानेही हजेरी लावून सिद्धीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

वाढदिवस आणि लग्न ठरल्याचा विधी असे दोन्ही क्षण यावेळी साजरे करण्यात आले. विशाल दलाल हा बदलापूरचा असून आर्किटेक्ट आहे. सध्या स्टुडिओ आर्कि-कल्चर येथे तो प्रोजेक्ट आर्किटेक्ट म्हणून कार्यरत आहे. 

 

 

अभिनेत्री सिद्धी पाटणे ही मूळची खेड, रत्नागिरीची. इथेच तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे मुंबई युनिव्हर्सिटीमधून तिने एमबीएचे शिक्षण घेतले. मालिका चित्रपटातून काम करत असताना तिला एका व्हिडीओ सॉंगमध्ये झळकण्याची नामी संधी मिळाली. “गोव्याच्या किनाऱ्याव…” या गाजलेल्या गाण्यामुळे सिध्दी महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. 

 अभिनेता चिराग पाटीलसोत सिध्दीचा एक नवा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

लोभस चेहरा आणि निरागस हास्य यामुळे सिध्दीने अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकली. 

मॉडेलिंग क्षेत्रातसुध्दा सिध्दीचं चांगलंच नाव आहे. तसंच अनेक इव्हेंट्समध्ये सिध्दीला उपस्थित राहण्यासाठी पहिली पसंती देण्यात येते. 

आता लवकरच सिद्धी पाटणे दलाल घराण्याची सून होणार आहे. मात्र ती लग्न कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

 

Recommended

Loading...
Share