सासरच्या घरातील या व्यक्तींना अमृता सुभाष मानते गुरुस्थानी

By  
on  

आयुष्यात गुरुचं महत्त्व वादातीत आहे. जीवनातील प्रत्येक वळणावर दिशा देणारा मार्ग दाखवणारा गुरु प्रत्येकाच्या जीवनात असतोच. अभिनेत्री अमृता सुभाषनेही गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीबाबत पोस्ट शेअर केली आहे. अमृता म्हणते, ‘गुरुपौर्णिमा . माझ्या सासूसासर्यांनी मला खूप मोलाच्या गोष्टी शिकवल्या आहेत म्हणून आजचा दिवस त्यांच्यासोबत असण्याचा आनंद आगळा आहे.

 

 

आयुष्य भले चढउतारांनी भरलेलं असेल,कित्येक गोष्टी भले तुमच्या मनाप्रमाणे घडतही नसतील काही वेळा, तरीही आसपासच्या रोजच्या साध्या सुध्या गोष्टींमधे आनंद आणि समाधान शोधता येऊ शकतं हे त्यांनी मला शिकवलं. सहजीवनाचा खरा अर्थ त्याच्याकडे पाहून समजतो. त्यांचं हे निर्मळ हसू मला फार भावतं.संदेशला त्याचं हसू कुठून मिळालं हे पुढच्या फोटोत पहा’. या सोबत अमृताने अनेक फॅमिली फोटोही शेअर केले आहेत.

Recommended

Loading...
Share