राज कुंद्रा पॉर्न सिनेमा प्रकरणी मराठी अभिनेता उमेश कामतचं नाव निष्कारण गोवण्यात आलं आहे. उमेशने या प्रकरणाबाबत संताप व्यक्त करत कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. उमेशच्या समर्थनार्थ आता अनेक सेलिब्रिटीही पुढे येत आहेत. उमेशच्या पोस्टला उत्तर देत प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणाली, ‘अब्रू नुकसानी चा दावा नक्की ठोक UK !!! हे पहिल्यांदा नाही होते. मागच्या वेळेला पण हेच केलं होतं ह्यांनी तुझ्याबाबतीत.’ हे खूप निंदनीय आहे.’
Irresponsible journalism. @aajtak @CrimeTakBrand #Newsnation pic.twitter.com/wqoq25u9k5
— Umesh Kamat (@kamat_umesh) July 21, 2021
यानंतर अवधूत गुप्ते म्हणतो, खरंच कमाल आहे ह्या लोकांची!! “सर्वात आधी” च्या गडबडीत काहीही करतील! मित्रा.. तू महाराष्ट्राचा लाडका आहेस. उगाच टेंशन घेऊ नकोस. पण, किमान पत्रकारितेच्या प्रमाण नैतिकतेला अनुसरुन त्यांनी त्याच माध्यमातून त्याच लांबीच्या बातमीने दिलगिरी व्यक्त करायला हवी.. हे मात्र नक्की!! या सोबतच अभिनेत्री क्रांती रेडकरनेही उमेशचं समर्थन करणारी पोस्ट शेअर केली आहे.
खरंच कमाल आहे ह्या लोकांची!! "सर्वात आधी" च्या गडबडीत काहीही करतील! मित्रा.. तू महाराष्ट्राचा लाडका आहेस. उगाच टेंशन घेऊ नकोस. पण, किमान पत्रकारितेच्या प्रमाण नैतिकतेला अनुसरुन त्यांनी त्याच माध्यमातून त्याच लांबीच्या बातमीने दिलगिरी व्यक्त करायला हवी.. हे मात्र नक्की!!
— Avadhoot Gupte (@AvadhootGupte) July 22, 2021