राज कुंद्राच्या एपसाठी सईला विचारणा झालीच नाही, गहनाचे दावे फोल - सईच्या टीमचा खुलासा

By  
on  

अश्लिल व्हिडीओ निर्मितीप्रकरणी प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा  पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या पोलिस कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ करण्यात आलीय. या प्रकरणात अनेक खुलासे समोर होत आहेत. त्यापैकीच एक धक्कादायक खुलासा म्हणजे त्याच्या नव्या एपसाटी तो एका मराठी अभिनेत्रीची निवड करणार होता. ‘हॉटशॉट्स’ला पर्याय म्हणून राज कुंद्रा एक नवीन एप लॉन्च करणार होता. या एपपवरील चित्रपटासाठी त्यानं त्याची मेव्हणी शमिता शेट्टी आणि मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरच्या नावाचा विचार केला होता, असा दावा अभिनेत्री गहना वशिष्ठ हिनं एका मुलाखतीत केला होता.

सईच्या नावाचा उल्लेख झाल्याने सर्वच माध्यमांमधून आणि खास करुन मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आलं होतं. पण सूत्रांनुार सईच्या टीमकडून असं सांगण्यात येत आहे, की सईचा आणि राज कुंद्राच्या एपचा काहीही संबंध नाही. तसंच गहानाच्या दाव्यात काडीमात्र तथ्य नसल्याचंसुध्दा सई ताम्हणकरच्या टीमने स्पष्ट केलंय. 

 सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, मराठमोळी सई ताम्हणकर आता बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा झेंडा अटकेपार रोवतेय. मराठीतील  प्रसिध्द अभिनेत्री ही क्रिती सेननसोबतच मिमी या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. ओटीटीवर हा सिनेमा येत्या  30 जुलै रोजी प्रदर्शित होतोय. 

Recommended

Loading...
Share