अभिनेत्री अभिज्ञा भावेही झळकणार ‘पवित्र रिश्ता 2.0’ मध्ये? शेअर केला फोटो

By  
on  

प्रेक्षकांच्या भेटीला पवित्र रिश्ता 2.0 ही मालिका पुन्हा एकदा येण्यास सज्ज झाली आहे. या मालिकेच्या च्या शुटिंगला नुकतीच  सुरुवात झाली. या मालिकेत शाहीर शेख मानवच्या तर अंकिता लोखंडे पुन्हा एकदा अर्चनाच्या भूमिकेत झळकणार आहे.  पहिल्या सीझनप्रमाणेच यंदाही मराठी कलाकार या मालिकेत दिसणार आहेत.

 

 

अभिनेत्री अभिज्ञा भावेही या मालिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. अभिज्ञाने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्ह्णते ‘पवित्र रिश्ता’ ऑफ मी अ‍ॅण्ड माय मिरर’. या फोटोमध्ये अभिज्ञा अगदी साध्या लूक्समध्ये दिसते आहे. आता तिचा या मालिकेतील भूमिकेबाबत मात्र अजून खुलासा झाला नाही.

Recommended

Loading...
Share