सध्या पश्चिम महाराष्ट्र पुरासारख्या भीषण परिस्थितीशी झुंजतो आहे. पश्चिम महाराष्ट्राला परिस्थितीसाठी राज्यभरातून हळू हळू मदतीचा ओघ येताना दिसतो आहे. पण याबाबत बॉलिवडकर मात्र कमालीचे उदासीन दिसत आहेत. बॉलिवूडकर नेहमी जागतिक स्तराच्या मुद्द्यावर सोशल मिडियाच्या माध्यमातून बोलताना दिसतात. पण आता मात्र कोणीही चकार शब्द काढत नाही. यावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सवाल विचारला आहे.
आपल्या सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून ते म्ह्णतात, ‘इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेकजण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्वीटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतकार्य सुरु केलेलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटतायत. अशावेळी माझ्याच राज्यात राहून मोठे झालेल्या बड्या बॉलिवूड ताऱ्यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातभार लावावा असं जाहीर आवाहन करतो’.