मराठी सिनेसृष्टीतली एक लाडकी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ओळखली जाते. जुळून येती रेशीम गाठी मालिकेमुळे प्राजक्ता घराघरांत पोहचली. प्राजक्ता आता महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेतील बहारदार सूत्रसंचलनाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकते. तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.
प्राजक्ताने स्वतःचा काव्यसंग्रह ‘प्राजक्तप्रभा’ प्रकाशन पार पाडलंय. ग्रंथाली प्रकाशित ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ता एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आली आहे. त्यानंतर आता तिच्या एका स्पेशल कवितेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलीय. तिच्या बॉयफ्रेंडसाठी तिने ही कविता केली असल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय.
काही वर्षापूर्वी प्राजक्ता माळी तिच्या युरोप ट्रीपमुळे बरीच चर्चेत आली होती. तिच्या या यूरोप ट्रीपमध्ये एका मुलासोबतचे फोटोज शेअर केल्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडबद्दल बरीच चर्चा सुरू झाली होती. फोटोमधला मुलगा तिचा बॉयफ्रेंड आहे का? अभिनेत्री प्राजक्ता माळी कुणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे का? असे अनेक प्रश्न तिच्या फॅन्सना पडले होते. त्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच तिच्या प्रेमाची कबुली दिलीय. इतकंच नाही तर तिने तिच्या बॉयफ्रेंडसाठी कविता लिहून प्रपोज केलं होतं.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केलाय. अभिनेत्री प्राजक्ता माळी जेव्हा अकरावीत होती, त्यावेळी ती एका मुलाच्या प्रेमात पडली होती. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तिने एक कविता लिहिली होती. प्रेमाचां रंग ओळखल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या पेनाने तिने ही कविता लिहीली होती. “प्यार, इश्क, मोहब्बत…ये लब्जभी…सरल शब्द जैसे, सरल नहीं…तो क्या इसके रास्ते और मंजिले क्या खाक सरल होंगे….” अशा ओळींची तिने ही प्रेम कविता लिहिली होती. तिने बॉयफ्रेंडच्या नावाचा खुलासा केलेला नाही.
तसंच आता प्राजक्ता सिंगल असल्याचं सांगितलं जातंय. ती योग्य वराच्या शोधात असल्याचं बोललं जातंय.