अजय देवगणच्या 'तान्हाजी' सिनेमात झळकलेल्या अभिनेत्रीचा 'नखरा' पाहिलात का?

By  
on  

बॉलीवूड चित्रपट "तानाजी : द अनसंग वारियर" मधून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी डॉ. इलाक्षी गुप्ता चांगलीच लोकप्रिय ठरतेय. सिेनमात सोयराबाई साकारणा-या इलाक्षीचा सोशल मिडीयावर मोठा चाहता वर्ग आहे. 

आता  इलाक्षी गुप्ता "भ्रम" या मराठी चित्रपटातून पदार्पण करणार आहे. अभिनेत्रीने सध्या आपल्या इंस्टाग्रामवर आपले नवीन म्युझिक विडिओ "नखरा" चे पोस्टर आऊट केले आहे ज्याने करून तिचे चाहते तिच्या आगामी गाण्यासाठी खूप उत्सुक आहे. 

 

हे पोस्टर चमकदार रंगांनी अतिशय आकर्षक दिसत आहे ज्यात आम्हाला एलाक्षी स्पॅगेटी टॉप मध्ये अतिशय सुंदर दिसत आहे त्यासोबत मोत्यांच्या अ‍ॅक्सेसरीज ने तिने आपल्या लुकला पूर्ण केले आहे. 


 

नखरा हे गाणे 30 जुलै 2021 रोजी पीबीएच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज होणार आहे, इलाक्षी आपल्या आगामी म्युसिक विडिओ बद्दल बोलताना म्हणाली,  '' पीबीए म्युझिकसह माझे नवीन सिंगल जाहीर केल्याने मला खरोखर आनंद झाला आहे आणि हे गाणे इतर गाण्यांपेक्षा वेगळे असेल आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना माझे काम आवडेल आणि ते  ह्या गाण्यावर जबरदस्त थिरकतील."
 

Recommended

Loading...
Share