ऑनस्क्रीन भावाबाबत अभिनेते मिलिंद गवळी यांनी व्यक्त केल्या या भावना

By  
on  

‘आई कुठे काय करते’ मालिकेत नुकतीच अनिरुद्ध देशमुखचा भाऊ म्हणजेच अविनाश देशमुखची एन्ट्री झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेता शंतनू मोघे अविनाश या व्यक्तिरेखेत दिसतो आहे. अनिरुद्ध साकारणा-या मिलिंद गवळी यांनी शंतनूसोबत पुन्हा काम करण्याच्या योगाबाबत शेअर केलं आहे. ते म्हणतात, ‘तेरा वर्षानंतर परत एकत्र काम करायची संधी"

 

 

शंतनु मोघे या अतिशय गोड माणसाबरोबर 2006-2007 मध्ये "हळद तुझी कुंकू माझं" या सिनेमामध्ये पहिल्यांदा काम केलं ,या सिनेमाचं संपूर्ण शूटिंग सातार्याच्या आजूबाजूच्या खेडेगावात झालं, शंतनूचा तो पहिलाच मराठी चित्रपट होता, मराठी चित्रपट सृष्टीत त्याचं पदार्पण या सिनेमानं झालं, एका उत्तम कलाकाराचा तो मुलगा असल्यामुळे त्याच्यातही ते सगळे गुण होते, पहिलाच चित्रपट असला तरी कामाची जाण खूप छान होती, कष्ट करायची तयारी होती , त्याचा सगळ्यात उत्तम गुण म्हणजे तो माणूस म्हणून खूपच गोड लागवी, and a through Gentleman आहे.

आमचं ते शूटिंग रानावनात ,शेतात, गावा-खेड्यात होत॔, त्यामुळे वातावरण अतिशय सुंदर, पंधरा-वीस दिवसाचा शूटिंग होतं, त्यात त्याच्याशी छान मैत्री झाली ,नेहमीप्रमाणे शूटिंग संपलं, डबिंग, सिनेमा रिलीज झाला, तू चित्रपट बर्‍यापैकी यात्रेला चालला आणि मग आम्ही परत डोंबाऱ्याचा खेळ वेगळ्यावेगळ्या लोकांबरोबरच खेळू लागलो , तेरा 14/15 वर्षानंतर "आई कुठे काय करते " या मालिकेतला अविनाश ,जो अनिरुद्ध चा लहान भाऊ गेली 15 वर्ष कधी घरी आलाच नाही, आप्पांवर रागवून गेला होता ,तो अचानक अरुंधती च्या आग्रहासाठी घरी परत येतो,माझ्यासाठी अविनाशचं परत येण आणि अविनाश म्हणून शंतनुच येणं किती योगायोग आहे बघाना,मिलिंद गवळी साठी एक प्रेमळ मित्र, जो गेली 14 /15 वर्ष कधी त्याला भेटलाच नाही,
एकत्र काम करायचा योग कधी आलाच नाही आणि अनिरुद्ध देशमुख हा त्याचा भाऊ धाकटा भाऊ पंधरा वर्ष कधी भेटायला आला नाही ,त्याचं येणं, हा खरच किती भन्नाट योग आहे ,

 

अविनाशचं casting कास्टिंग जवळजवळ महिना दोन महिना चालू होतं, कोण अविनाश च काम करणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती, मी चार वेळा नमिताला विचारलं, झालं का ,झालं का फायनल, अचानक एक दिवस मेकप रूमmakeup मध्ये शंतनू भेटला , आणि मला खूप आनंद झाला ,माझा आनंद मला शब्दात मांडता येणार नाही .

काल अनिरुद्ध आणि अविनाश भांडण्याचा सीनscrne आम्ही दोघांनी केला,शंतनूने ज्या पद्धतीने तो सिन scene केला , मी भारावून गेलो ,पहिल्या सिनेमा पासनं आत्ताच्या "आई कुठे काय करते" पर्यंतचा शांतनु चा प्रवास ,खूप कष्टाचा, मेहनतीचा ,आणि प्रामाणिकपणाचा असणारच, याची खात्री झाली,त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या शंतनुला खूप खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद’

Recommended

Loading...
Share