रिंकू राजगुरुच्या फोटोवर शाहिद कपूरच्या भावाने केली कमेंट्

By  
on  

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

 रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेयर करते. रिंकू सध्या तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे तिचे फिट लुकमधले फोटो चाहत्यांचं विशेष लक्ष वेधतात.

सैराटनंतर रिंकूने स्वताच्या फिटनेसवर खुप मेहनत घेतलीय. त्यामुळेतच मराठीसोबतच रिंकू आता  बॉलिवूडमध्येही आपले पाय रोवतेय. 

रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो नुकतेच शेअर केले आहेत. रिंकूचं हे पहिलं फोटोशूट असल्याचं तिने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे.

या फोटोत रिंकूचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय. डेनिम, टी शर्ट आणि त्यावर चौकटीचं जॅकेट शिवाय जॅकेटला मॅचिंग अशी बॅग हा रिंकूचा लू

रिकूंच्या या हटके  फोटोशूटवर  चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

मात्र रिंकूने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. ते म्हणजे बॉलिवूड अभिनेचा शाहीद कपूरचा भाऊ म्हणजेच अभिनेता इशान खट्टरच्या कमेंटने.

 

 

Recommended

Loading...
Share