पाहा Photos : प्रिया बापटचा आनंद गगनात मावेना, हे आहे कारण

By  
on  

मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकते. प्रिया सोशल मिडीयावर बरीच स्करीय असते. नुकताच काही खास फोटोशूटमधून प्रियाने तिचा आनंद व्यक्त केला आहे. तिचा आनंद गगनात मावत नाहीए. त्याला कारणसुध्दा तसंच आहे. 

 

प्रियाच्या दमदार अभिनयाने सजलेल्या सिटी ऑफ ड्रीम्स या वेबसिरीजचा दुसरा सीझन येत्या  जुलैला म्हणजेच अवघ्या दोन दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

सध्या प्रिया ‘सिटी ऑप ड्रीम्स 2’ प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

या प्रमोशननिमित्ताने तिचे अनेक रिफ्रेशिंग लुक्स पाहण्याची पर्वणी चाहत्यांना मिळतेय. 

 ‘सिटी ऑप ड्रीम्स 2' सिरीजमध्ये पौर्णिमा गायकवाड  ही दमदार भूमिका प्रिया साकारतेय. ही एका राजकीय वारसा चालवणा-या महत्त्वकांक्षी महिलेची भूमिका आहे. 

 

 '..आणि काय हवं' या वेबसीरिजच्या माध्यमातूनही तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लवकरच या सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

प्रिया बापटच्या खास फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Recommended

Loading...
Share