साडीत तुमची लाडकी स्विटू दिसली खुपच सुंदर, पाहा Photos

By  
on  

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही झी मराठीवरील मालिका अल्पावधितच लोकप्रिय ठरतेय. मालिकेतली ओम-स्विटूची प्यारवाली लव्हस्टोरी सर्वांनाच भावतेय.नावाप्रमाणेच गोड असलेली स्विटू प्रेक्षकांच्या मनात घर करतेय. 

मालिकेत स्विटू साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आपले विविध आऊट्फिट्स आणि मूड्समधले फोटो शेअर करत चाहत्यांची मनं जिंकते.

लाडक्या स्विटूने अलिकडेच लाल रंगातल्या साडीतले तिचे मनमोहक फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 


लाल रंगाच्या साडीत स्विटूच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. येऊ कशी तशीच्या आषाढी विशेष भागासी स्विटूने ही खास साडी नेसली होती. 

 

 

स्वीटू आणि ओमच्या प्रेमाची नलू परीक्षा घेतेय. अनेक अडचणींवर मात करून ओम या परीक्षेत यशस्वी  होतो ना होतोच नवं आव्हान उभं ठाकतं. मोहित चिन्याचा अपघात घडवून आणतो.तो मरणाच्या दारातून परत येतो. या सर्व प्रसंगानंतर ओम स्विटूचं नातं कोणतं वळण घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Recommended

Loading...
Share