By  
on  

आम्हाला भीक नको , काम करायचे आहे अभिनेत्री मेघा घाडगेने व्यक्त केली उद्विग्नता

गेले दीड वर्ष करोनाची लढाई संयमाने लढल्यानंतर आता रंगभूमी कलाकारांचा धीर सुटत चालला आहे. हाताला काम नसल्याने कालाकार आणि रंगमंच कामगार अस्वस्थ आहेत. आपल्या या अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत अभिनेत्री मेघा घाडगेने पोस्ट शेअर केली आहे.

 

 

ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘अगदीच तुटपुंज्या पाकिटावर समाधानी होणारे आम्ही...
अलीकडे मायबाप रसिक प्रेक्षकांच्या तो टाळ्यांचा आवाज कानी ऐकू येत नाही.
.अनुभवी मार्गदर्शकाची ती पाठीवरची पडलेली थाप गेला काही काळ हरवून गेली आहे....
तिसरी घंटा ऐकायची आहे .. पण तीच घंटा आज धूळ खात पडली आहे...  
मायबाप सरकारला एक विनवणी करतो, राजकारण्यांचे कार्यक्रम आमच्या नाट्यगृहात करता...आणि आम्ही कलाकार मात्र आमच्या घरात शिरायचे नाही, हा कोणता कायदा... आम्हाला भीक नको , काम करायचे आहे ... आम्हला आनंद तेंव्हा मिळतो जेंव्हा रसिक प्रेक्षक आमच्या कामाच्या मोबदल्यात टाळ्यांचा वर्षाव करतो ... आम्ही सुखी तेंव्हा दिसतो. जेंव्हा आमच्या कामातून प्रभोधन होत,आज या महामारीच्या काळात सगळ्यांना सवलती दिल्यात.. गरिबांना जेवण... श्रीमंतांना वर्क फ्रॉम होम...घरकाम करणारे ,माताडी कामगारांना,रिक्षा चालकांना सगळ्यांना एक आई सारखे आपण आपल्या पदराखाली जागा दिली... मग आम्ही काय पाप केलं... या मातीशी आम्ही प्रामाणिक आहोत... या महाराष्ट्राची संस्कृती सातासमुद्रा पलीकडे घेऊन गेलो... तुमच्या ही कामात हक्काने आम्हाला बोलावता... मग तो प्रचारासाठी असो वा सेलिब्रिटी म्हणून...त्या तुझ्याच लेकराला विसरलास ... आता तूच आमच्याशी अस वागणार तर आम्ही कोणाकडे पाहायचं... म्हणून तुला आमची आठवण करून देण्यासाठी,आमचं अस्तित्व टिकुन राहावे म्हणून, आम्ही आंदोलन करतो आहे...
#रंगकर्मीआंदोलन महाराष्ट्र
जागर रंगकर्मींचा

Author

Recommended

PeepingMoon Exclusive