अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्गा याला पॉर्न फिल्म बनविण्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. ह्या प्रकरणाने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडालीय. या प्रकरणात सध्या एक नाव भलतंच गाजतंय ते म्हणजे उमेश कामत याचं. राज कुंद्राचा सहकारी म्हणून उमेश कामतला अटकही झालीय. ह्या नावाचा आणि आपला मराठमोळा प्रसिध्द अभिनेता उमेश कामतचा नावातील साधर्म्यासह कुठलाही संबंध नाही. पण अनेक माध्यमांनी ब्रेकिंग न्यूज देताना कुठलीही शाहनिशा न करता अभिनेता उमेश कामतचा फोटो या बातमीत वापरला. त्यामुळे अभिनेता उमेश कामतला किती नाहक मनस्ताप सहन करावा लागला याची आपल्या सर्वांना कल्पना आहेच.
असाच एकदा आणखी एका मराठी अभिनेत्याला मनस्ताप सहन करावा लागला होता. २५ मे २०२१ रोजी मराठी अभिनेता संतोष जुवेकर ह्याच्या नावाशी एका मिळत्या जुळत्या वेगळ्याच संतोष जुवेकरने काही वादग्रस्त विधान केले होते. ते अलिबागशी निगडीत होते. त्यामुळे साहजिकच अलिबागकरांच्या भावना दुखावल्या गेल्या.याचाच परिणाम म्हणून कुठलीच शहानिशा न करता तिथल्या नगराध्यक्षांनी अभिनेता संतोष जुवेकरला खडे बोल सुनावले होते. त्या कमेंटमध्ये म्हटले होते, आता अलिबागचे नाव बदलायची वेळ आली आहे, जसे जिल्हा कुलाबा होता तो आता रायगड केला तसेच तालुका अलिबागचा ता. श्रीबाग ता. सद्गुरू बाग किंवा समर्थबाग करावा. ” ह्या त्यांच्या वक्तव्यावर प्रशांत नाईकांनी आता हा शहाणा आला म्हणून कमेंट करत म्हटले होते ” तुमच्यातला कोणीतरी फालतू कलाकार बोलला म्हणून आम्ही आमच्या गावच नाव नाही बदलणार. आम्हाला अलिबागचा अभिमान आहे.